धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार पुष्पाताई महाजन यांच्या प्रचारार्थ आज सकाळी धरणगावात रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज सकाळी शहरातील बालाजी मंदिरपासून राष्ट्रवादीच्या पुष्पाताई महाजन यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. बालाजी मंदिर, मोठा माळी वाडा,धरणी परिसरातून ही रॅली निघाली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पाताई महाजन यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी उमेदवार पुष्पाताई महाजन,शहर अध्यक्ष निलेश चौधरी, युवक शहर अध्यक्ष संभाजी कंखरे, लक्ष्मण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.