फुले मार्केटमध्ये गाळेधारकांवर कारवाई करताना उपायुक्तांना कोंडण्याचा प्रयत्न (व्हिडीओ)

fule market

जळगाव, प्रतिनिधी | येथील महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व किरकोळ वसुली पथक संयुक्तपणे कारवाईसाठी आज (दि.१४) उपायुक्त उत्कर्ष गुट्टे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी फुले मार्केटमध्ये आले. यावेळी ज्योती क्रिएशन या दुकानाला सील करण्यासाठी पथक गेले असता उपायुक्त गुट्टे यांनाच दुकानात कोंडण्याचा प्रकार करण्यात आला. हा वाद शहर पोलीस ठाण्यात पोहोचला असून तिथे पुढील कार्यवाही सुरु आहे. यावेळी या परिसरात व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती.

अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु केली.दोन गाळे सील केल्यानंतर तिसऱ्या गाळ्यावर कारवाई करीत असताना महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात लाईट बंद करून घेरण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे वातावरण चिघळल्याने उप आयुक्तांसह महापालिका कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेत शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित गाळेधारकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारीही प्रक्रिया सुरु केली. यावेळी गाळेधारकांनीही दुकाने बंद करून महापालिका प्रशासनाविरोधात एकत्र येवून घोषणाबाजी केली. तसेच एकजुटीने दुकाने बंद करून कारवाईचा निषेध केला.

 

 

Protected Content