साधन व्यक्ती निवडीसाठी तालुकाभरातून अर्ज ; अधिका-यांकडून ऐच्छिक निवड

nivad 1

बोदवड प्रतिनिधी । येथे ग्राम समुह तालुका साधन व्यक्तींची निवडीसाठी तालुकाभरातून अर्ज आले होते. यात निवड करतांना राजकीय, पुढारी आणि शासकीय अधिका-यांनी उमेदवारांची ऐच्छिक निवड केल्यामुळे तहसील अधिकारी रुपाली अडकमोल व गटविकास अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राम समुह तालुका साधन व्यक्तींची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षा होणार आहे. ग्राम पंचायतमधील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर साधन व्यक्तिच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल. मात्र आता जे उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ते तर त्यांच्या सांगण्यानुसारच वागणार आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामांच्या लेखापरीक्षामध्ये कोणत्याही बदल होणार नाही. कारण साधन व्यक्ति शैक्षणिक पात्रतेनुसार न निवडता अधिकारी पुढारी याच्या मर्जीतील आहे.

आपण उमेदवारांची निवड कोणत्या आधारे केली, निवड झालेल्या उमेदवार याचा रहिवासी पत्ता, निवड करतांना कोणते निकष लावले, असे प्रश्न विचारण्यात आले. यातच एका उमेदवाराने सांगितले की, मुलाखतीत माझे यादीत पाच नंबरला नाव होते. लाखती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली असतांना मला का घेतले नाही ? असे तहसीलदार यांना विचारले असतांना मी रबर स्टँप होतो. माझ्या हातात काही नव्हते, तर जिल्हा साधन प्रतिनिधी म्हणातात, मी बाहेर गाव वरुन आलो होते. मला जी यादी मिळाली त्या आधारे मी साधन व्यक्तीचे प्रशिक्षण घेत आहे.
गटविकास अधिकारी वाघ यांना आपण बाहेरील तालुक्यातील व व्यक्तिंची कशी निवड केली असे विचारले असतांना ती निवड दुस-या समितीने केली, असल्याचे सांगण्यात आले आहे.

Protected Content