पी.एम.पाटील यांनी केली शिवसैनिकांसोबत चर्चा

c665c851 b735 43cd 87eb e0c60e7bdf84

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी आज सकाळी जळगाव ग्रामीणमधील शिवसैनिकांशी प्रचारासंदर्भात चर्चा केली. तसेच राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना विजयी करण्यासाठी अंगझोकून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

 

पी.एम.पाटील सर यांनी आज सकाळी असोदा, भादली, शेळगाव परिसरातील शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी पं.स.सदस्‍य तुषार महाजन,युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या सोबत प्रचार रणनीती बाबत चर्चा केली. तसेच प्रचाराबाबत सूचना केल्या. यावेळी विनोद कोळी,बळीराम कोळी,भरत पाटील,अनिल मेंबर. श्री.कानसवाडे, युवराज कोळी, बापूशेठ नारखेडे,कुणाल इंगळे, श्री. भंगाळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा केली. तसेच राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Protected Content