जळगावात अवैध दारूचा साठा जप्त; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीरित्या दारूची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून साठवणूकीसाठी कारने वाहतूक करणाऱ्या कारसह अटक केली. कारमधील ३७ हजार रूपयाची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु (वय-५५) रा. आर.वाय. पार्क जळगाव हा आपल्या कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ००१०) च्या डिक्कीत दारूच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता इच्छादेवी चौफुलीवरील विजय वाईन्स वरून त्याचा मालक मुफद्दर अलीहुसेन अमरेलीवाला रा. आदर्शन नगर यांच्याकडे घेवून जात असल्याचे सांगितले. याबाबत कोणताही परवाना नसल्याने त्याच्या ताब्यातील देशी विदेशी दारू व बियर असे ३७ हजार रूपयांची दारू व २० लाखची फोर्ड कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपी सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु यांच्या विरोधात पोहेकॉ विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदीप पाटील, सफौ आनंदसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोकॉ निलेश पाटील, सचिन पाटील यांनी कारवाई केली.

Protected Content