जळगावात अवैध दारूची विक्री करणाऱ्या अटक; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारुची वाहतूक करून मेहरुणमध्ये विक्री करणार्‍या एकास अटक केली असून त्याच्या ताब्यातील १०५ लिटर व दुचाकी हस्तगत केली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांना एक तरुण दुचाकीवरुन गावठी दारुची वाहतूक करुन मेहरुणमध्ये विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार लोकरे यांनी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर, मुकेश पाटील, सचिन पाटील, सचिन चौधरी या पथकाला सुचना केल्या. माहितीनुसार पथकाने मेहरुण गाठले. या परिसरातील स्मशानभुमी जवळून संजय तुकाराम सपकाळे (वय-४६) रा. समतानगर याला दुचाकी (क्र. एम.एच.१९ डी.एम. ४२२३) वर येतांना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली असता, दुचाकीला लटकविलेल्या कॅममध्ये गावठी दारु आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी १०५ लीटर दारु असलेल्या तीन कॅन तसेच दुचाकीसह संजय सपकाळे यास ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content