चाकूचा धाक दाखवून ‘कात्या’ची दहशत

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात फळ विक्री करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील तीन हजाराची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री नऊ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फयाज युनूस बागवान (वय-१९) रा. शिवशक्ती चौक, अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फळ विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अमळनेर बसस्थानकाजवळील त्याच्या दुकानावर फळ विक्री करत असताना संशयित आरोपी कात्या उर्फ गौरव प्रमोद महाले रा. शिवाजी नगर, शिरूर नाका, अमळनेर हा तिथे आला. त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत तरूणाच्या गल्ल्यातून तीन हजार रुपयांची रोकड जबरी काढून पसार झाला. हा प्रकार घडल्यानंतर फयाज बागवान या तरुणाने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री नऊ वाजता संशयित आरोपी कात्या उर्फ गौरव प्रमोद महाले यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.

Protected Content