Home क्राईम जामनेर तालुक्यात एका महिलेचा विनयभंग; संशयिताला पोलीसांकडून अटक

जामनेर तालुक्यात एका महिलेचा विनयभंग; संशयिताला पोलीसांकडून अटक

0
37


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेचा मध्यरात्री झोपलेली असतांना एकाने अश्लिल कृत्य करत विनयभंग केल्याचा खळबळजनक घटना समोर आली आहे. संशयिताला पोलीसांनी अटक केली असून  जामनेर पोलीस ठाण्यात रविवारी २५ जून रोजी सकाळी ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी २४ जून रोजी मध्यरात्री महिला ही कुटुंबियांसह गच्चीवर झोपलेली असतांना गावात राहणारा विजय समाधान धुरकर हा आला. महिलेजवळ येवून तिच्याशी अंगलट केले. त्यानंतर तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशय आरोपी विजय समाधान धुरकर यांच्या विरोधात रविवारी २५ जून रोजी सकाळी ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यास असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे.


Protected Content

Play sound