माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील व रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था चालक महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील व जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या कार्याध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित मागण्या व समस्यां संदर्भात चर्चा करून निवेदन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या  अशा मागील काही वर्षापासून राज्य सरकारकडे शैक्षणिक संस्था चे तीन हजार कोटी वेतनेत्तर अनुदान थकित असून किमान एक वर्षाचे एक हजार कोटी अनुदान प्रदान करावे. शिक्षक नोकर भरती पवित्र पोर्टल प्रणाली रद्द करण्यात यावी. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती वरील बंदी तात्काळ उठवावी.शिपाई पद कंत्राटी पध्दतीने न भरता पूर्वीप्रमाणे भरावे. कोरोना महामारी निर्मुलनासाठी वैद्यकीय सानुग्रह अनुदान देण्यात यावे. आर.टी.ई.प्रवेश परतावा प्रतीपुर्ती करावी. घोषित, अघोषित तुकड्यांना अनूदानाचा टप्पा तात्काळ मान्यता द्यावी. शैक्षणिक ईमारत कर आकारणी माफ करण्यात यावी. वीज कर व पाणी पट्टी कर घरगुती कर आकारणी प्रमाणे करावा. ई.मागण्या निवेदनाव्दारे मांडण्यात आल्या.

यावर शरदचंद्र पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह संयुक्तिक बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासित करून .सकारात्मक चर्चा केली व दहावी, बारावीच्या परिक्षांवर टाकलेला बहिष्कार माघारी घ्यावा व राज्य सरकारला सहकार्य करावे, असे प्रस्तावित केले.

या भेटी प्रसंगी माजी शिक्षण मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार विजय गव्हाणे, गणपतराव बलवाडकर, जागृती धर्माधिकारी इ.मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content