खाशाबा महाविद्यालयात युवती सभे अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभा अंतर्गत व्यक्तीमत्व या एकदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

मंगळवार दि. ८ मार्च्र रोजी आयोजित कार्यशाळेच्या प्रथम सत्रात महापौर जयश्री महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हितेश ब्रिजवासी, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुजाता रडे, समन्वयक उमेश इंगळे यांची तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यशाळेत एकूण चार सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. या चारही सत्राचे विषय आणि मार्गदर्शक अनुक्रमे आर्थिक सुदृढता आणि महिला स्वाती भावसार, जीवन व्यवस्थापन डॉ. विवेक काटदरे, उच्च शिक्षण, उद्योजकता आणि आत्मनिर्भरता अजिंक्य तोतला, महिलांविषयीचे कायदे आणि माहिती डॉ. विजेता सिंग असे होते. या सर्व सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थीनींना वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रेरीत करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात विवेकानंद प्रतिष्ठानच्या सह-कोषाध्यक्ष हेमाताई अमळकर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.,सुनील कुलकर्णी, विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापन अधिकारी दिनेश ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेत शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला. सर्व सहभागी विद्यार्थिनींना यावेळी प्रमाणपत्र देखील देण्यात आले. कार्यशाळा प्रमुख म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हितेश ब्रिजवासी यांनी काम पाहिले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुजाता रडे, आशा पाटील, हितेंद्र सरोदे, मुरलीधर चौधरी, कल्पना पाटील, डॉ. संतोष बडगुजर आणि सुनील बारी आदींनी सहकार्य केले.

Protected Content