Home Uncategorized सोनसाखळी लांबवणार्‍यांना अटक

सोनसाखळी लांबवणार्‍यांना अटक

0
24

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ रेल्वेस्थानकावर प्रवासी महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी व पर्स लांबवणारी महिला व पुरूषास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

धोंडुराम लक्ष्मण भोसले (वय २१) व रंजना लक्ष्मण पवार (वय २७, रा.मेहरूण तलाव परिसर) यांनी भुसावळ रेल्वेस्थानकावर एका महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे वजनाची सोनसाखळी व पर्समधून ५० हजार रुपयांची रोकड लांबवली होती. या प्रकरणी आरपीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील पोलिस जळगावात तपासासाठी आले होते. तत्पूर्वी या संबंधित महिलेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. हे फुटेज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी इमरान सय्यद, रेल्वे पोलिस रेहान खान, कल्पना जाधव यांना मिळाले होते. त्यांना संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली. यानंतर या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची कबुली दिली.


Protected Content

Play sound