धरणगाव तालुक्यात आज आढळले दोन कोरोनाबाधित रुग्ण

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यात दोन कोरोनाने बाधीत रुग्ण आढळून आल्याचा अहवाल आज सायंकाळी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात पाळधी (बु) व सोनवद (बु) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

 

धरणगाव येथील कोविड केअर सेंटरने काही जणांचे स्वॅब सँपल पाठविले होते. यातील दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले आहे. यात पाळधी (बु) व सोनवद (बु) येथील प्रत्येकी एक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. आतापर्यंत धरणगाव तालुक्यात १०५ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यातील ६९ रुग्ण बरे होऊन हरी परतले आहेत. तर ८ जण मयत झाले आहेत. दरम्यान, संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्‍या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत असली तरी संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content