जळगाव जिल्ह्यात आज नवीन ७५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज नवीन ७५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता २१४९ इतकी झालीय. यात सर्वाधिक ३७ रुग्ण पारोळा येथे तर भुसावळ तालुक्यातही रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे.

 

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पारोळा ३७, जळगाव शहर १२, जळगाव ग्रामीण ०, भुसावळ ९, अमळनेर ४, धरणगाव २, यावल २, एरंडोल ३, जामनेर १ तर रावेरच्या ५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, पारोळ्यात एकाच दिवसात ३७ रूग आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तर संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्‍या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे.

Protected Content