पहूर येथे विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट; एक पॉझिटिव्ह

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथे कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच असून विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्याची अभिनव मोहीम पहूर पोलीसांनी सुरु केली असून आज पहिल्याच दिवशी ३ जणांपैकी एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढत असतांना सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक केले असले  तरीही काही लोक नियमांचे पालन न करता नियम धाब्यावर ठेवून  बेजबाबदारपणे वागत असून  पहूर  बस स्थानक परिसरात वीना मास्क फिरणाऱ्या तब्बल  १०२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून  १० हजार २००रुपये दंड वसूल केला आहे .

पहूर बस स्थानक परिसरात व्यवसायिक फळविक्रेते तसेच नागरिकांनी मास्क किंवा हात रुमाल बांधावा यासाठी पहूर पोलीस स्टेशनचे  पोलिस निरीक्षक राहुल खताळ , पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , पोलीस निरीक्षक अमोल देवडे यांच्यासह पोलीस कर्मचारी वारंवार जनजागृती करीत आहेत . कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन ‘दरम्यान नागरिकांनी विनाकारण बाहेर फीरू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले आहे.

 

Protected Content