भुसावळात दंडात्मक कारवाईतून १ लाखांची वसूली

भुसावळ प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा, याकरिता ‘शासनाने कडक निर्बंध व गाईडलाईन जारी केली आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९४ व्यावसायिकांसह २३६ वाहनचालकांवर तब्बल १ लाख १० हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे, राज्य शासनाच्या कोरोना चैन तोडण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. मात्र अद्यापही नागरिक निष्काळजीपणाने शहरात बिनधास्त मुक्तसंचार करताना दिसत आहे. अशांवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलीस, शहर पोलीस, पालिका प्रश्नासनाचे कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी असे वेवेगळे पथक नियुक्त करण्यात आले आहे. शहरात बाजारपेठ परिसर, रजा टॉवर, अष्टभूजा चौक, गांधी धी चौक, यावल रोड, जळगाव रोड, सातारा भाग परिसर यासह मुख्य परिसरात नियमाच्या चौकटीत न बसणारे दुकान चालक, व्यापाऱ्यांवर कारवाई करत 500 व काही ठिकाणी हजारापेक्षा जास्त रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

याशिवाय शहरात कारण नसताना विना मास्क फिरणाऱ्या, सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवणाऱ्या तब्बल 236 नागरिकांवर 200 रुपयेप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय शहरात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांची अँटीजेन चाचणी करण्याची मोहीम राबवली जात आहे. यात तब्बल 80 पेक्षा जास्त नागरिकांची टेस्ट करण्यात आली.

Protected Content