नांदेड येथील तरूणाचा परळी-बीड महामार्गावरील अपघातात जागीच मृत्यू

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नांदेड येथील तरूणाचा बिड जिल्ह्यातील बीड-परळी महामार्गावरील दिद्रुड गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. माजलगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले असून मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, सचिन आनंद भोळे (वय-३६) रा. नांदेड ता. धरणगाव ह.मु. पांढरी मंदीराजवळ नांदेड तरूण औरंगाबाद टोलकाटे कंपनीत कामाला आहे. फिरस्ती राहत होती. त्यामुळे कामाच्या निमित्ताने सचिनला जिल्ह्यात ऑर्डरप्रमाणे दुचाकीने व्हिजीट देण्याचे काम करत होता. ४ डिसेंबर रोजी साकाळी परळी जि. बीड येथे कामाच्या निमित्ताने गेला होता. काम आटोपून सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच ४१ एमएल १८६८) ने कामाहून घरी परतत असतांना परळी-बीड महामार्गावरील दिद्रुड गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात सचिनने घातलेल्या हेलमेटचे तुकडेतुकडे झाले होते. डोक्याला जबर मार बसल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेह धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे आणण्यात आले. रविवारी ५ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सचिनच्या पश्चात आई अलकाबाई, वडील आनंदा, पत्नी मृणाली, भाऊ उल्हास असा परिवार आहे.

Protected Content