धानवड गावातील १८ शेतकऱ्यांना फसवणूकप्रकरणी दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकऱ्यांची कापूस व्यापाऱ्यांपे तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला होता़ याप्रकरणी तीन जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन जणांना रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आली आहे.

प्रदीप रंगलाल पारधी (रा़ धानोरा ता़ चोपडा) व अनूप उर्फ गोलू ओमप्रकाश तिवारी (रा़ प्रजापतनगर, जळगाव) असे अटक झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, अमोल भगवान व्यास (रा़ अयोध्यानगर) अनूप तिवारी, प्रदीप पारधी या तिघांनी पंधरा दिवसात पैसे देतो सांगून तालुक्यातील धानवड येथील १८ शेतकºयांचा ४ हजार ७०० रपूये दराने कापूस खरेदी केला़ २९ मे ते ९ जून या कालावधीत पूर्ण झाल्यानंतर या व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे शेतकºयांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली़ त्यानंतर वाल्मीक एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणाºया तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गुरूवारी रात्री दोघांना अटक
एमआयडीसी पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला़ तपासचक्र फिरविल्यानंतर प्रदीप पारधी हा धानोरा येथे असल्याचे कळताच गुरूवारी रात्री त्यांना गावातून अटक करण्यात आली़ त्यानंतर अनुत तिवारी याला जळगाव शहरातून पोलिसांनी अटक केली़ दरम्यान, या टोळीचा मुख्यमोरख्या अमोल व्यास हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत़ शनिवारी अटक केलेल्या दोन्ही संशयितांना हजर करण्यात येणार आहे़

Protected Content