जळगावात फळांवर होतोय कार्बाईडचा मारा !; दोन फळविक्रेत्यांच्या गोदामाची तपासणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फळविक्रेते आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आंबा पिकविण्यासाठी कार्बाइडचा मारा सरू केला तर मोसंबीवर रासायनिक स्प्रे मारत करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील यांनी चार दिवसांपुर्वी अन्न व औषध प्रशासनाला केली होती. त्यानुसार आज सकाळी गोलाणी मार्केटमधील फळांच्या दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली. यात काही फळ नमुना म्हणून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
शहरातील गोलाणी मार्केटमध्ये मोसंबीचा केलेला साठावर रासायनिक स्प्रे मारला जातोय तर इतर फळांवर रासायनिक प्रक्रिया करून पिकविले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील, रेखा पाटील यांनी जळगाव महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे चार ते पाच दिवसांपुर्वी तक्रार केली होती. महानगर पालिका आणि अन्न व औषध विभागाच्या पथकाने आज सकाळी ९ वाजता गोलाणी मार्केटमधील दोन फळविक्रेते यांच्या दुकानावर धडक कारवाई केली. यावेळी पथकाने गोडावूनची संपुर्ण तपासणी केली, त्यात

जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूने मान वर केली आहे. त्यातच सणाचा गैरफायदा घेत शहरातील फळविक्रेते मोठ्या प्रमाणावर कमी कालावधीत फळ पिकविणे कठीण असल्याने घातक रसायन वापर फळांना आकर्षक, टवटवित ठेवण्यासाठी करत आहे. आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रत्यांनी आंबा पिकविण्यासाठी कार्बाइडचा मारा सरू केल्याची तक्रारीवरून दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील आणि रेखा पाटील यांना मोसंबी फळांवर आकर्षक करण्यासाठी स्प्रे मारत असल्याचा एक व्हिडीओ व्हॉटस्ॲपवर आला. त्यानुसार त्यांनी आरोग्य विभागाला कळविण्यात आले होते. आरोग्य अधिकारी चौकशी करण्यासाठी गेले असता फळविक्रेत्यांची दुकाने बंद दिसून आले. त्याचदिवशी पुन्हा दुसरा व्हिडीओ आला, त्यात फळांना पिकविण्यासाठी कार्पेटचा वापर करतांना दिसून आला. आज सकाळी अन्न व औषधी प्रशासन आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील दोन फळविक्रेत्यांची दुकाने तपासली. दुकानातील मोसंबी आणि काही फळे नमुना म्हणून घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषधी विभागाच्या अधिकारी महाजन यांनी सांगितले. अहवालात गैररित्या काही आढळून आल्यास संबंधित फळविक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Protected Content