प. वि.पाटील विद्यालयात रंगली चित्रकला स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍युज प्रतिनिधी ।  केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघा तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला वेगवेगळ्या विषयांवर आधारित सदर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रंगांचा उपयोग करून रंगकाम यावेळी केले.  स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content