तालुकावासियांनी सण साध्या पध्दतीने साजरे करा – अपर पोलिस अधीक्षिका नवटके

रावेर प्रतिनिधी । मोहरम आणि गणेश उत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासन प्रर्यत्नशील मोहरम आणि गणेशउत्सव शासनाने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे साध्या पध्दतीने साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे, असे अवाहन अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी केले.

रावेरात आयोजित शांतता समितीच्या बैठकीते त्या बोलत होत्या. येथील मराठा मंगल कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज गणेशउत्सव व मोहरम यांच्या पार्श्वभूमिवर शांतता समितीची बैठक आज झाली.

यावेळी व्यासपिठावर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले उपविभागिय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, तहसिलदार उषाराणी देवगुणे, नगरपालिका मुख्यधिकारी रविंद्र लांडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पदमाकर महाजन शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महमूद शेख, भास्कर महाजन अशोक शिंदे, दिलीप कांबळे, बाळु शिरतूरे, गयास शेख, यूसुफ खान, सादिक शेख, असदुल्ला खा, हरीष गनवाणी, पिंटू महाजन, अॅड प्रवीण पाचपोहे नितिन पाटील, मोहरम व गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

सोशल डिस्टन्सिंग ठेऊन उत्सव साजरे करा- नरेंद्र पिंगळे
आगामी येणारे सण व उत्सव कोरोना काळात सोशल सोशल डिस्टेंसिंग ठेऊन घरच्या घरात साजरे करावे, कोणीही कायदा-सुव्यस्थेचे सुध्दा पालन करण्याचे अवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी केले.

Protected Content