Home Cities जळगाव समृद्धी संतचे खासदार उन्मेश पाटील यांनी केले अभिनंदन

समृद्धी संतचे खासदार उन्मेश पाटील यांनी केले अभिनंदन

0
33


 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याची अभिमान असलेली तथा एनसीसी गर्ल्स एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रातील वरिष्ठ अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे प्लाटून पथकाचे दिमाखदार संचलन झाले. तिच्या या कामगिरीचे खासदार उन्मेश पाटील यांनी कौतुक करून अभिनंदन केले. 

प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावरील पथसंचलनात नेतृत्व करणाऱ्या समृद्धी संत हीचे आज जळगाव येथे तिच्या विद्युतकॉलनी येथील राहत्या घरी जाऊन खासदार उन्मेश पाटील यांनी शिवप्रतीमा देवून अभिनंदन केले. यावेळी भाजपचे जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र घुगे पाटील एरंडोल ता अध्यक्ष मछिनंद्र  पाटील,जिल्हा पदाधिकारी बापु ठाकरे, प्रा भगतसिंग निकम  जिल्हा प्रसिद्धी प्रमूख मनोज भांडारकर, धीरज वर्मा  उद्योजक समकित छाजेड (चाळीसगांव),  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आजी प्रेरणा संत, आजोबा चंद्रकांत संत, आई अर्चना संत, वडील हर्षल संत , भाऊ सार्थक संत, मैत्रीण निकीता पाटील,शेजारी अटाळे काका,दिलीप पाटील, प्रशांत शर्माजी शुभांगी शर्मा, जयाजी तिवारी, जितेश तिवारी, नितिन मुळे असा सर्व सन्माननीय परीवार उपस्थित होते.

 

 

 


Protected Content

Play sound