बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांना शरण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आमिष दाखवून बलात्कार करणारे संशयित आरोपी शनीपेठ पोलीस ठाण्यात आज शरण आले आहे. पुढील कारवाई शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

तेजस दिलीप सोनवणे (वय-२०) आणि चेतन पितांबर सोनार (वय-२०) अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गल्लीतील राहणाऱ्या तेजस सोनवणे याच्यावर प्रेम होते. मुलगी दहावीचा निकाल घेण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी शाळेत गेली होती. निकाल घेतल्यानंतर परत घरी जात असतांना तेजस सोनवणे आला. त्यावेळी तेजसचा मित्र चेतन सोनार हा देखील होता.

तेजसने मुलीला दुचाकीवर बसवून शहरातील कोल्हे हिल्स टेकडीवर नेवून गप्पा मारल्या. त्यांच्या पाठोपाठ चेतनही दुचाकीने कोल्हे हिल्सवर पोहचला. पीडिता आणि तेजसच्या गप्पांनंतर एका इमारतीच्या आडोश्याला तेजसने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. याचवेळी चेतने चोरून मोबाईलमध्ये फोटो काढले होते. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलीने तेजसशी बोलणे बंद केले होते. दोघांचे बोलणे बंद झाल्याचा गैरफायदा घेत चेतन सोनार याने पिडीतेशी मैत्री वाढविली.

वर्षभर चाललेल्या मैत्री नंतर चेतनने पिडीतेला गोड बोलून फेब्रुवारी २०२० (नक्की तारीख माहिती नाही) मध्ये पुन्हा कोल्हे हिल्स येथे नेले. पिडीत मुलीला यापुर्वी तेजसने केलेल्या बलात्काराचे फोटो दाखविले. हे फोटो पाहून अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. “मलाही शरीर संबंध प्रस्थापित करू दे, नाहीतर हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, तुझ्या घरच्याने मोठे नुकसान करेल अशी धमकी दिली”. धमकीनंतर चेतननेही फोटो दाखवून पिडीत मुलीचा गैरफायदा घेवून बलात्कार केला. तोपर्यंत ही घटना मुलीने आई वडीलांना सांगितलेली नव्हती.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांनी पिडीत मुलीच्या नावाने शेरेबाजी करण्यास सुरूवात केली. ते फोटोची धमकी देवून पुन्हा दोघांसोबत संबंध ठेवण्याबाबत दबाव टाकत होते. हे सर्व असह्य झाल्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार पिडीत मुलीने आईवडीलांना सांगितला.

पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांच्याविरूध्द पोक्सो कायद्यांतर्गत १३ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही संशयित आरोपी फरार होते. सर्व पर्याय संपल्यानंतर संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार हे दोघे आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शनीपेठ पोलीसांना शरण आले आहे. पुढील कारवाई शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content