किरणकुमार बकाले व अशोक महाजन यांना सेवेतून बडतर्फ करा – मराठा समाजाची मागणी

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यांना मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले व अशोक महाजन यास सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने  केली असून या संदर्भात पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील निवेदन देण्यात आले.

या निवेदनात “जळगाव जिल्हा लोकल क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून कनिष्ठ कर्मचारी अशोक महाजन यांच्याशी बोलतांना मराठा समाजा विषयी आक्षपार्ह व अत्यंत हिन दर्जाचे संभाषण केले असून त्याची ध्वनिफीत व्हायरल झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे.

मराठा समाज आरक्षण मागणीसंदर्भात समाजाने शांतताप्रिय मार्गाने मराठा समाज बांधवांच्या सहभागाने मोर्चे काढले व आंदोलन केले. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन तेंव्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांवर कुठलाही ताण पडू नये; म्हणून मराठा समाजाने काळजी घेतली. या शांततापूर्ण मराठा समाजाविषयी आक्षपार्ह वक्तव्य करून पोलीस निरीक्षक बकाले व अशोक महाजन यांनी जाणीव पूर्वक समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात रोष निर्माण केला आहे.

पोलीस निरीक्षक किरण बकाले पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली निलंबनाची कारवाई पुरेशी असून त्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यासह अशोक महाजन यांनाही तात्काळ पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.” अशी मागणी शेंदुर्णी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असून ‘मागणी पूर्ण न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून संवैधानिक मार्गाने आंदोलन करावे लागेल. तरी निवेदनाची त्वरित दखल घेऊन कारवाई करावी.’ असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

जिल्हा पोलिस अधीक्षक जळगांव यांना निवेदनाची प्रत देऊन मराठा समाजाच्या भावना कळविण्यात येतील. असे आश्वासन याप्रसंगी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे व उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी समाजाच्या शिष्टमंडळास दिले.

Protected Content