Home प्रशासन तहसील बकालेंना तात्काळ अटक करा; मराठा समाजाची मागणी

बकालेंना तात्काळ अटक करा; मराठा समाजाची मागणी

0
40

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रा. मुकेश येवले, प्रा. अनिल पाटील, भास्कर पाटील, ॲड. देवकांत पाटील, बापू जासूद, निळकंठ यादव, अतुल यादव, सुनील गावडे, अशोक पाटील, प्रशांत पाटील, अरुण पाटील, लहू पाटील, डी.सी. पाटील, यशवंत पाटील, किरण पाटील, सुधाकर पवार, सुनंदा परदेशी, सिंधुबाई कोळी, माधुरी गुप्ता, विनोद पाटील, द्वारकाबाई पाटील, रवींद्र कोळी, संतोष पाटील, हर्षल महाडे, बि.डी.पाटील, विजय चौधरी, आर.डी. पाटील, ॲड. गोविंद बारी, जि.प.चे माजी सदस्य रवींद्र पाटील यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी निलंबीत पोलीस निरिक्षक किरण बकाले यांना अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन यावलचे तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर.डी. पाटील यांना देण्यात आले.


Protected Content

Play sound