लोणी येथे पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांवर हल्ला : चौघांना अटक

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील लोणी या गावात ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे सह पोलिस कर्मचाऱ्यांवर गाव गुंडांनी हल्ला चढवला याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

लोणी या गावात ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर रीतसर तक्रार देऊन पोलिस अधीक्षक यांच्याकडून बंदोबस्त मागवण्यात आले होते. यासाठी पहूर पोलिस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, संजय बनसोड, पोलीस कर्मचारी दिनेश मारवडकर, अशोक शिंपी, आदी कर्मचारी लोणी येथे गेले होते. यावेळी या अतिक्रमणधारक दत्तू उगले यांना सांगितले की, आपण अतिक्रमण केले असून ते काढून घ्यावे असे आदेश कोर्टाचे आहे. हे सांगत असताना अचानक दत्तू उगले व सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करत हल्ला केला. त्यामुळे या घटनेतील दत्तू उगले, ज्ञानेश्‍वर उगले, माधव उगले, काशिनाथ उगले यांच्याविरुद्ध पहूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे करीत असून अशाप्रकारे नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे

 

Protected Content