आधार जोडणीसाठी जिल्ह्यात शिबीराचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत आयोगाच्या सुचनेनुसार मतदान कार्ड व आधारकार्ड जोडणीसाठी जिल्ह्यात ११ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी टी. हुलवळे यांनी आज शुक्रवार, दि. ९ सप्टेंबर रोजी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे. 

भारत आयोगाच्या सुचनांनुसार मतदान कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मोहिम १ ऑगस्टपासून सुरु झालेली असून आतापर्यंत जळगाव जिल्हयात एकूण ७ लाख ४० हजार ४४५ मतदारांनी मतदार ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी केलेली आहे.

सदर कार्यक्रमात मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडणीसाठी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदर दिवशी मतदार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपले मतदान केंद्रावर पूर्णवेळ हजर राहतील. 

तरी जळगांव जिल्हयातील सर्व मतदारांनी ११ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्यावा व आपले मतदान ओळखपत्र आधार क्रमांकांशी जोडणी करुन घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

Protected Content