गुलाबभाऊंचे खंदे शिलेदार राजेंद्र महाजन कालवश

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक राजेंद्र महाजन यांचे आज आकस्मीक निधन झाल्याने धरणगावच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख, व्यंकटेश ॲग्रो एजन्सी चे संचालक,तथा नगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य राजेंद्र महाजन यांचे आज आकस्मीक निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली.

राजेंद्र महाजन हे ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक होते. आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते भाऊंच्या समर्थनासाठी शिंदे गटात दाखल झाले होते. आगामी नगरपालिका निवडणुकीची धुरा देखील त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत होते. मात्र आज अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकताच धरणगावच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

Protected Content