जागतिक योग दिनानिमित्त योग समन्वय समितीतर्फे ‘विशेष कलाकृती स्पर्धा’चे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । योग समन्वय समितीतर्फे जागतिक योग दिवस साजरा करण्यासाठी ‘विशेष कलाकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ‘योगा विथ फॅमिली अर्थात पारिवारिक योग’ या विषयावर ‘विशेष कलाकृती सादर करता येणार आहे. यात निबंध, चित्र, पोस्टर, कविता, चारोळी, छोटी नाटिका, रांगोळी आदी कलाकृती सादर करावयाची आहे.

योग समन्वय समितीची स्थापना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राज्यभर योग समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा समितीची स्थापना झाली असून यात विभाग प्रमुख किरण बच्छाव, जिल्हा प्रमुख कृणाल महाजन, प्रसिद्धी प्रमुख तुषार भांबरे, जितेंद्र कोतवाल, स्पर्धा प्रमुख चित्रा महाजन तर सदस्य म्हणून स्मिता पिले, पल्लवी उपासनी, दीपा लोढा, सीमा पाटील, प्रतिभा कोकंदे, सोनाली पाटील, हितेश ब्रिजवासी, ज्ञानेश्वर पाटील, योगराज चौधरी आदी योग शिक्षक तथा सहकारी सहभागी आहेत. या समितीच्या माध्यमातून लवकरच योगा विथ फॅमिली ही थीम घेऊन योग साधनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.

बक्षिस वितरण
सहभागी स्पर्धकाने सादर केलेली कलाकृती २० जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाव, पत्ता, संपर्क क्रमांकासह स्पर्धा प्रमुख चित्रा महाजन ९४२३१८५९८१ या क्रमांकावर पाठवावे. २१ जून रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असून प्रत्येक कलाकृती नुसार प्रथम आणि द्वितीय बक्षीस जाहीर करण्यात अशी माहिती आयोजकांकडून कळविण्यात येत आहे.

Protected Content