बिअर बार फोडून मद्याची चोरी करणारे दोघे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या रेल्वे स्थानकावरील पुनम बिअर बार फोडून चोरट्यांनी आत करुन ८३ दिवसात वेळोवेळी याच मार्गाने आत येऊन बारमधील १ लाख ७४ हजार ८२० रुपयांच्या १२३२ मद्याच्या बाटल्या चोरल्या होत्या. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भांगार गोळा करणारे दोन संशयित राजकुमार मांगीलाल विश्वकर्मा (वय २१, मुळ रा. दुर्ग, छत्तीसगड, हल्ली मु. शिवाजीनगर) व तस्लीम खान मेहमूद खान (वय १९, रा. गेंदालाल मिल) यांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. सुरूवातील पोलीस पथकाने तस्लीम याला अटक केली होती. नंतर अधिक चौकशी केली असता दुसरा संशयित राजकुमारला भुसावळातून अटक केली. राजकुमार व तस्लीम हे दोघे हॉटेल पुनमच्या मागच्या बाजूस भंगार गोळा करीत असताना त्यांना एक्झॉस्ट फॅन काढून आत जाण्याचा मार्ग दिसला. याच मार्गाने मद्याच्या बाटल्या चोरल्या होत्या. या चोरट्यांना पोलिस निरीक्षक अरुण निकम, विजय निकुंभ, अक्रम शेख, गणेश शिरसाळे, गणेश पाटील, सुधीर साळवे, भास्कर ठाकरे, गणेश वाघ, तेजस मराठे, योगेश इंधाटे, किशोर निकम यांचे पथक शोधत असतांना ही कारवाई केली. हे दोघे शहरात भंगार गोळा करण्याचे काम करतात. यातून दोघांची गट्टी झाली आहे. भंगार गोळा करीत असताना त्यांना भुरट्या चोऱ्या करण्याची सवय लागली होती. दोघांविरोधत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content