चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी श्याम सोनार

चोपडा, प्रतिनिधी | चोपडा व्यापारी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी श्याम सोनार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

चोपडा व्यापारी महामंडळाचा वाढता कामाच्या व्याप पहाता या आधी व्यापारी महामंडळाची दोन उपाध्यक्ष कार्यरत आहेत. व्यापारी महामंडळाच्या कामाचा व्याप वाटुन घेण्यासाठी सोनार समाजाचे माजी अध्यक्ष व चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे सदस्य शाम सोनार यांची चोपडा तालुका व्यापारी महामंडळाची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र अध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी दिले असून सर्व सदस्यांनी सोनार याचे निवडीबद्दल कौतुक केले आहे.त्याच्या या निवडीबद्दल त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, कार्याध्यक्ष सुशील टाटीया, सल्लागार चंदुलाल पालीवाल, अनिल वानखेडे,भंवर जैन, माजी नगरसेवक संजय कानडे, उपाध्यक्ष संजय श्रावगी, सचीव राजेंद्र जैन,प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पाटील,सदस्य प्रफुल स्वामी आदी उपस्थित होते.

Protected Content