कमिशनचे आमिष दाखवत तरूणाची ऑनलाईन फसवणूक !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला ऑनलाइन पैसे गुंतवणूक करण्याचे सांगून बदल्यात कमिशन देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३ लाख १० हजार ८६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बुधवारी ११ जानेवारी रेाजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील मराठे गल्लीत राहणारा मुर्तजा अहमद शेख इसहाक (वय-३०) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह करतो. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ दरम्यान त्याला टेलिग्राम अँपच्या माध्यमातून एका अनोळखी आयडीवरून फोन आला. त्यात सांगितले की, ॲपच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक केल्यास आपल्याला त्या बदल्यात कमिशन मिळेल असे सांगून त्यांना अमिष दाखविले. यानंतर मुर्तजा अहमद शेख हिसहाक यांनी वेळोवेळी पेटीएम व इतर ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे ३ लाख १० हजार ८६४ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. दरम्यान त्यांना त्याच्या मोबदल्यात कुठलेही कमिशन मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर मुर्तुजा अहमद शेख इसहाक यांनी बुधवार ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेलिग्राम ॲप अज्ञात आयडीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.

Protected Content