मोहाडी येथील तरूणीने घेतले विष; प्रकृती अत्यवस्थ

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथील १८ वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेतल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, दिपाली राजमल राठोड (वय-१८) रा. मोहाडी ता. जि.जळगाव ही कुटुंबियांसह राहते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरातील कोणते तरी विषारी औषध घेतले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने शहरातील खासगी रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. पुढील चौकशी एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content