जळगावात जनरल स्टोअर्सचे दुकान फोडले; शहर पोलीसात गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी । श्यामाप्रसाद मुखर्जी शॉपींग कॉम्लेक्स मधील अपंग व्यक्तीने दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडले असून दुकानातील साडे सात हजार रूपये रोख आणि ७ हजार रूपयांचा किरकोळ वस्तू असा एकुण १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, आनंद बाबुलाल पाटील (वय-४२) रा. शिवाजी नगर हे पायाने अपंग असून त्यांचे शहरातील जुने जिल्हा परिषदेसमोरील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाच्या बाहेर असलेले शॉपींग कॉम्लेक्समध्ये भगवती जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. जनरल दुकान गेल्या ८ वर्षापासून असून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बाजूला असलेल्या मुतारीच्या भिंतीवर चढले. व भिंत फोडून आत प्रवेश करत दुकानात ठेवलेले ७ हजार ५०० रूपयांची रोकड आणि ७ हजार रूपयांचा सामान असा एकुण १४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी बाजूच्या पानटपरीधारक रमेश सपकाळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आंनदा पाटील यांना फोन करून दुकान फोडल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून दुकानाची पाहणी केली. दरम्यान पोलीस ठाण्यात आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content