अवैध वाळू धंद्याशी पोलिसाचे संबंध !, दीपककुमार गुप्ता यांची तक्रार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यात वाळू वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आता नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अवैध वाळूप्रश्नी लक्ष घातले आहे. त्यामुळे अवैध वाळू कारवाईंना वेग येत आहे. तालुक्यातील दापोरा येथे एका पोलिसाने स्वतःच वाळू ठेका चालवित असल्याची पोलिसांना माहिती मिळाली असून त्याबाबत तपास सुरु आहे. तालुका पोलीस स्टेशनचे प्रोबेशनरी अधिकारी आप्पासो पवार यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे दापोरा येथे ७ ते ८ ट्रॅक्टर अवैध वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, संबंधित पोलिसाची चौकशी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलिसांना ऑनलाईन केलेल्या तक्रारीवरून हि माहिती समोर आली आहे. त्यात म्हटले आहे की, तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू वाहतूकदारांशी संबंध असून त्याचे स्वतःचे एक ट्रॅक्टर दुसऱ्याच्या नावावर घेतलेले आहे. तसेच दापोरा येथे अवैध वाळू साठा करून ठेवला आहे. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे प्रोबेशनरी अधिकारी आयपीएस आप्पासो पवार यांनी दापोरा येथे धडक कारवाई करून ७ ते ८ ब्रास वाळू जप्त केल्याची माहिती मिळाली.  दुसरीकडे पोलीस कर्मचारी गायकवाड यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु केली असून अवैध वाळू व्यवसायाशी संबंध काय आहेत, त्याची तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content