धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे विहिरीत विवाहितेचा आढळला मृतदेह

WhatsApp Image 2019 09 02 at 12.57.19 PM

जळगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील सासर असलेल्या महिलेचा मृतदेह गावाजवळील शेतातील विहिरीत आढळून आला. मात्र पती व सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे.याप्रकरणी धरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, सुवर्णा तुषार बाविस्कर (वय २० रा. चावलखेडा ता.धरणगाव) यांचे लग्न ३१ डिसेंबर २०१८ रोजी चावलखेडा येथील तुषार भागवत बाविस्कर (वय २५) यांच्याशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले. मात्र सुवर्णा यांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्रास देणे सुरू केल्याचे तिने वडील नामदेव पाटील (रा. शेरी, ता. धरणगाव) यांना सांगितले. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता चुलत बहीण माधुरी संजय पाटील तिला फोन करून सांगितले की, माझा नवरा मला छळ करून मारहाण करतो तसेच मी त्यांना आवडत नाही, असे देखील सांगितले होते. आज सकाळी ५ वाजता चावलखेडा शेत शिवारातील शेतातील विहिरीत सुवर्णाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, तिच्या पती तुषार बाविस्कर याने सुवर्णा चावलखेडा येथून शनिवार ३१ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार धरणगाव पोलिसात दिली होती. सुवर्णा हिचा मृत्यू झाला आहे हे तिच्या नातेवाईकांना कळताच जिल्हा रुग्णालयात दाखल झाले व आक्रोश केला. दरम्यान पती तुषार पाटील यांच्यासह सासू आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत सुवर्णाचे काका संजय दोधू पाटील यांनी घेतला आहे.

Protected Content