लॉकडाऊनचे उल्लंघन; वाघोदा खुर्द येथील १५ ग्रामस्थांसह दारू विक्रेत्यावर गुन्हा

सावदा प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या वाघोदे खुर्द गावात अवैधरित्या देशी, गावठी दारूची बंदी करावी अशी मागणी करण्यासाठी आलेल्या नगरीकांकवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, येथुन जवळ असलेल्या वाघोदे खुर्द येथे २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महिला व पुरूष एकत्र जमवुन गावात सुरू असलेले अवैध दारूचे दुकान बंद करावे अशी मागणी सावदा पोलीसांकडे केली. मात्र एकत्रीतरित्या आल्याने त्यांच्यावर सावदा पोलीस स्थानकात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल कण्यात आला. तर अवैधरित्या दारूची विक्री करणारा संशयित आरोपी गंगाराम गणपत तायडे रा. वाघोदे खुर्द यांच्या घारात ५५० किंमतीची ११ लिटर गावठी दारू जप्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामस्थांकडून जमावबंदीचे उल्लंघन
गोष्टीचे गावात पडसात उमटताच गावातील नितिन नरेंद्र चौधरी, पवन घनश्याम चौधरी, गणेश संजय चौधरी, राजेंद्र किशोर भालेराव, राजु हैदर पटेल, हितेंद्र प्रकाश चौधरी, चेतन युवराज तेली, मोहन दामोदर कोळी, संदीप ज्ञानेश्वर तेली, गिरीष ऊर्फ आत्माराम चौधरी, जयेश सुनिल शिंदे, कविता संतोष तेली, आशाबाई घनश्याम चौधरी, विमलबाई रामभाऊ तेली, उषाबाई रमेश शिंदे इतर १० ते १५ जणांविरोधात यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सपोनि राहुल वाघ यांच्या् मार्ग दर्शन खाली पांडुरंग सपकाळे आदि करत आहे.

Protected Content