यावल येथे मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण (व्हिडीओ)

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । देशात राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मीय समाज बांधवांमध्ये अमन शांतीसह भाईचारा कायम राहावा, यासाठी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईदच्या सामुहिक नमाज पठण करण्यात आले.

मौलाना सैय्यद समीउल्ला कादरी यांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली. नमाज पठणानंतर पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली. यावल येथील ईदगाह मैदानावर आज दिनांक ३ मे मंगळवार रोजी सकाळी ८:४५ वाजता मुस्तीम बांधवांच्या पवित्र रमजानच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण महीनाभर ठेवण्यात येणाऱ्या रोजे (उपवासा) ची सामुहीक नमाज पठणानंतर सांगता झाली. कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात नंतर ईदगाह च्या मैदानावर सामुहीक नमाज पठण करण्यात आल्याने मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मौलाना सेय्यद समीउल्ला कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले .

याप्रसंगी ईदगाह मैदानावर मुस्लीम कांधवांना शुभेच्छा देण्यासाठी यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार , सहाय्यक पोलीस अधिक्षक आतिश कांबळे , माजी आमदार रमेश चौधरी , काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रमाकर अप्पा सोनवणे , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, ईदगाह कमेटीचे अध्यक्ष हबीब शेख नसीर, उपाध्यक्ष शेख करीम शेख रज्जाक,सचीव अस्लम शेख नबी ,खजिनदार हाजी हकीम शेख अल्लाऊदीन, नरईस शेख, हाजी गफ्फार शाह , हाजी फारूख शेख , युसुफ खान , रशीद खान , शेख ईमाम, शेख अल्ताफ, रशीद खान, अन्सार सर यांच्यासह कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , राष्ट्रवादीचे शेख सईद रशीद, मोहसीन खान , युवक काँग्रेसचे फैजान शाह, पुंडलीक बारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!