तरूणाची गळफास घेवून आत्महत्या; संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. परंतू मित्रांनी पैश्यांसाठी तगादा लावल्याने त्याने आत्महत्या केली असून तिघांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

गोरख अशोक कोळी (वय-२२) रा. हरविठ्ठल नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोरख कोळी हा आई आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. बांधकामाच्या ठिकाणी सेंटींग काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गोरख कोळी हा त्याच्या मित्र सोनू कोळी याच्यासोबत राहत होता. दरम्यान, सोमवारी २ मे रोजी घरी कुणीही नसतांना गोरखने राहत्या घरात दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्याने समोर आले. दरम्यान, गोरख कोळी यांचे मामा प्रल्हाद कोळी हे रामेश्वर कॉलनीत राहतात. गोरखने आत्महत्या केली असून त्याला गळफास देण्यात आला आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोरखचा मित्र सोनू कोळी आणि इतर दोन जण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून तिनही मित्रांनी संगनमताने त्याला गळफास दिली आहे असा आरोप मयत गोरखची आई आक्का आणि मामा प्रल्हाद कोळी यांनी केला आहे. घटनास्थळी संशयास्पद स्थितीत गळफास घेतल्याने आढळून आले आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!