एरंडोल विकासोवर १३ उमेदवारांची बिनविरोध निवड

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सहकार क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या एरंडोल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व १३ उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

पैकी १० उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला. यात कर्जदार खातेदार प्रतिनिधी गटात दुर्गादास राजाराम महाजन,योगराज भाऊलाल महाजन,विजय पंढरीनाथ महाजन, नितीन सदाशिव महाजन, राजेंद्र दोधू चौधरी,राजधर संतोष महाजन,ईश्वर नारायण पाटील,पंडीत लकडू पाटील तर इतर मागासवर्ग प्रतिनिधी रविंद्र शांताराम महाजन यांची तसेच अनुसुचित जाती जमाती/भटक्या जमाती,वामन दौलत धनगर,रघुनाथ राजाराम ठाकुर व महिला राखीव मतदार संघातून सुमनबाई हरचंद महाजन, निर्मलाबाई देविदास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सदर बिनविरोध निवडीसाठी,आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व रमेश परदेसी, एडवोकेट किशोर काळकर, रमेश महाजन, डॉक्टर सुरेश पाटील, रमेश निंबा महाजन, शांताराम धुडकू महाजन, विक्रम महाजन, रुपेश महाजन, संजय महाजन, किशोर निंबाळकर, प्राध्यापक मनोज पाटील, आशीर्वाद पाटील, अरुण पाटील, सुदर्शन महाजन, सुनील महाजन, प्रकाश चौधरी, जगन महाजन,अशोक महाजन प्रल्हाद महाजन, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश देशमुख, अशोक मोरे, रघुनाथ महाजन, भगवान देशमुख, शालिग्राम गायकवाड, सुधाकर देशमुख, विठ्ठल देशमुख, विजय महाजन यांनी परिश्रम घेतले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!