पारोळा येथे श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील सुवर्णकार समाजाचे आरोग्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त येथील अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय पारोळा येथे श्री संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत नरहरी महाराजांच्या मूर्तीचे पूजन समाजाचे अध्यक्ष छोटू शेठ जडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथाचे वाचन गिरीश टोळकर यांनी केले यावेळी समाज बांधव व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री नरहरी महाराजांची आरती समाजाचे अध्यक्ष श्री छोटू शेठ जडे व अनिल शेठ टोळकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी समाजाचे अनेक महिला व पुरुषांनी देखील श्री संत नरहरी महाराजांचे पूजन केले यावेळी झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात समाजाचे श्री संजय वासुदेव जडे व दीपक वासुदेव जडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पारोळा अहिर सुवर्णकार मंगल कार्यालय वीस टेबल व 80 खुर्च्या देण्याचे जाहीर केले समाजाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी संजय जडे व दीपक जडे या दोघे भावांचे आभार मानले.

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील संत श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी पारोळा शहरासह परिसरातील समाज बांधवांनी व महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी पारोळा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष श्री छोटू जडे श्री अनिल टोळकर श्री नितीन सोनार मा नगराध्यक्ष श्री दिलीप सोनार श्री दीपक सोनार श्री रवींद्र सोनार श्री वासुदेव सोनार श्री अरुण सोनार श्री गोविंद टोळकर व सर्व संचालक मंडळ व पारोळा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री योगेश शेठ सोनार व सर्व कार्यकारणी संचालक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिर सुवर्णकार नवयुवक मित्रमंडळाचे कार्यकारणी व सदस्यांनी सहकार्य केले. श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित सर्व संचालक व समाज बांधव उपस्थित होते

Protected Content