हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खु यांनी दिला राजीनामा

शिमला-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी मुख्यमंत्री वीरभद्र यांचा मुलगा विक्रमादित्य यांनी सीएम सुखविंदर सुखू यांचे नाव न घेता त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. आमदारांकडेही दुर्लक्ष झाले, त्याचा परिणाम काल दिसून आला, असेही ते म्हणाले. आता चेंडू हायकमांडच्या कोर्टात आहे. मंत्री आणि आमदारांच्या नाराजीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावर आता काँग्रेस वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

मंगळवारी राज्यसभा निवडणुकीनंतर ठाकूर यांनी हे पाऊल उचलले. निवडणुकीत 6 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. यानंतर सुखू सरकारवर संकट कोसळू लागले.सायंकाळी काँग्रेस आमदारांची बैठक होईल. यात नव्या नेत्याची निवड होऊ शकते. उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंग हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत

Protected Content