रेल्वे स्थानक परिसरातील दुचाकी लंपास ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची  दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शुभम विष्णू घुरे (वय-२५) रा. कासमवाडी जळगाव हा तरूण मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान जळगाव रेल्वे स्थानक परिसरात (एमएच १९ सीएस ४३९५) क्रमांकाची दुचाकी घेवून आला. दुचाक पार्किंगला लावली होती.

 

त्यावेळी अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. शुभम घुरे याने दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.

Protected Content