एकनाथराव खडसे कोरोना पॉझीटीव्ह

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला देत उपचार सुरु केले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना चौकशीसाठी हजर होण्यास अंमलबजावणी संचालनालयाने ( इडी )१४ दिवसांची मुदतवाढ दिली आहे

इडीची पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीच्या व्यवहाराबद्दल नोटीस मिळाल्यानंतर एकनाथराव खडसे मुंबईला गेले होते तेथे त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती . या वैद्यकीय तपासणीच्या आधारावर एकनाथराव खडसे यांना आता खुलासा करण्यासाठी हजर होण्यासाठी १४ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे असे सांगण्यात आले .

खडसे यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांच्याबद्दल इडी कडून काय भूमिका घेतल्या जाते याची उत्सुकता जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत होती . ज्या व्यवहाराच्या मुद्द्यावर ही नोटीस आपल्याला देण्यात आली त्या व्यवहाराची आधीच राज्य सरकारने ४ वेळा चौकशी केलेली आहे त्यामुळे जास्त काही अडचण होणार नाही अशी आशा असल्याचे खडसे यांनी नोटीस मिळाल्यानंतर लगेच सांगितले होते आपण इडीला पूर्ण सहकार्य करू असेही ते म्हणाले होते .

Protected Content