उद्वव ठाकरेंच्या सभेच्या नियोजनासाठी शिवसेनेच्या तालुकानिहाय बैठका

0
शेअर करा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य जाहीर सभेच्या जय्यत तयारीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात तालुकानिहाय जिल्हा पदाधिकऱ्यांचे दौरे निश्चित करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ऐतिहासिक होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या बैठका घेतल्या जाणार आहेत.

तालुका निहाय संपर्क दौरे सोमवार पासून सुरु होत आहेत. त्यानुसार दि.4 फेब्रुवारी पारोळा येथे सकाळी 11 वाजता,एरंडोल येथे दुपारी 2 वाजता  दि.5 फेब्रुवारी अमळनेर येथे सकाळी 11 वाजता, धरणगाव येथे दुपारी 2 वाजता. दि.6 फेब्रुवारी चाळीसगाव येथे सकाळी 11 वाजता,भडगाव येथे दुपारी 1 वाजता तर पाचोरा येथे दुपारी 2 वाजेला तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुका बैठकांना सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार किशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेर, महिला जिल्हा संघटक महानंदाताई पाटील तसेच जळगाव लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा संपर्क प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला संबंधित तालुक्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, शहरप्रमुख, संघटक, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सभापती,उप तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख , पंचायत समिती गण प्रमुख, शाखा प्रमुख, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य , वि.का. सोसायटी चेअरमन व संचालक, व महिला आघाडी, युवासेना तसेच अंगीकृत आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!