जळगाव जिल्हा काँग्रेस ओ.बी.सी. जिल्हाध्यक्षपदी योगेश महाजन

0
शेअर करा !

एरंडोल ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी एरंडोल येथील योगेश युवराज महाजन यांची निवड करण्यात आली आहे. ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे व ओ.बी.सी. कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी शामकांत ईशी यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग प्रदेश कार्यकारीणीची बैठक दादर मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमोद मोरे, कार्याध्यक्ष अमित कारंडे, प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली व पक्ष बळकटीबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस ओ..बी.सी.विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगेश महाजन यांची निवड करण्यात आली. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून एरंडोल नगरपालिकेचे कॉंग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक आहेत. तसेच ते माळी महासंघाचे युवक प्रदेश उपाध्यक्षही आहेत.

योगेश महाजन यांच्या निवडीबद्दल काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी वामशी चांद रेड्डी, जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष संदीपभैया पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, ओबीसी प्रदेश कमिटीचे सरचिटणीस अशोक खलाने, प्रदेश सचिव डी.जी .पाटील, प्रदेश सरचिटणीस अँड.ललिता पाटील, जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, युवक कॉंग्रेस प्रदेश चिटणीस पराग पाटील, अल्पसंख्यक सेल जिल्हा अध्यक्ष मुन्वर खान, लोकसभा शेत्र प्रमुख सुकलाल महाजन, तालुका अध्यक्ष विजय महाजन, शहर अध्यक्ष संजय भदाणे, युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान सय्यद, डॉ.भूषण पाटील, डॉ.फरहाज बोहरी, मदन भावसार, शे.सांडू, आर.स.पाटील, सुनील पाटील, मक्सूद पटेल आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!