अमळनेरला संविधान बचाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

1
शेअर करा !

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील तालुकास्तरीय संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने तहसिलकार्यालया समोर तालुक्यातील विविध सामाजिक वर्गाच्या समूहाने शांततेच्या व संविधानिक मार्गाने एकदिवसिय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार यांच्यावतीने तहसिल प्रतिनिधी श्री.बोरसे यांनी विविध मागण्याचे निवेदन स्वीकारले. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देत आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आंदोलनाला पाठींबा दिला.

संविधान बचाव समितीच्या वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चर्चा न करता मंजुर केलेले आर्थिक निकषावरील १० टक्के आरक्षणाचे विधेयक विनाविलंब रद्द करावे, एस.सी.एस.टी व ओ बी सी यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रर्याप्त प्रतिनिंधीत्व दिले जावे.ओ.बी.सींवर लावलेले क्रिमिलेयर रद्द करावे. ओ.बी.सी,एनटी, डी.एनटी ,व्ही.जे. एनटी यांची जातीनिहाय जनगणना केली जावी. खाजगी क्षेत्रात आरक्षणाचा कायदा बनवून लागु करावा .एस.सी. एस.टी. अन्याय अत्याचार निवारान कायदा अधिक मजबुत करावा. आागामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरने मतदार घेण्यात यावे, या प्रमुख इत्यादी मांगण्यासह संविधान बचाव संदर्भात राष्ट्रपती यांना तहसिलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला समाजातील सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या निवेदनावर संयोजक रणजित शिंदे यांच्यासह राष्ट्रीय किसान मोर्चाचे शिवाजी पाटील, विभागीय अध्यक्ष हिरालाल पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण देशमुख, मौलाना रियाज, गुलाम नबी, नाविद शेख, कुदरत अली, गावरणी जागल्याचे विश्वास पाटील, योगेश पाटील, ,तेली महासंगाचे संजय चौधरी,चेतन चौधरी, भारतीय बौद्ध महासभाचे, सिद्धार्थ सोनवणे,महिला संघाचे शिला सोनवणे, सरला संदांनशीव,विद्यार्थी मोर्च्याचे नितीन सैदाने, प्रवीण बैसाने, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे मोहसीन पठाण,युथ काँग्रेसचे मुकेश राजपूत, भारिप तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, युवाअध्यक्ष अरविंद बिर्हाडे,धनगर महासंघाचे विशाल पाटील,समाधान धनगर,संत भीमा संघटनेचे देविदास भोई,संभाजी ब्रिगेडचे उमेश बोरसे, आदिवासी संघटनेचे एम.व्ही.पारधी, भूषण साळूखे,संत सेनाचे आबा फुलपगारे, बीएसपीचे देवदत्त संदानशिव, अशोक मोरे, रमेश जाधव,अॅड.अभिजित बिर्हाडे, अॅड.शकील काजी, अॅड. विजय ढिवरे, अॅड. शिवकुमार ससाणे,आरपीआय तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने,सामाजिक कार्यकर्ते जयवंत शिसोदे, योगेश पाटील, प्रा. विजय तुंटे, प्रा. गुलाले, प्रा. विजय खैरनार,दिनेश बिर्हाडे, माळी महासंघाचे अमोल माळी, जय आदिवासी युवाशक्तीचे जिल्हा अध्यक्ष विकास सोनवणे, तालुका अध्यक्ष महेंद्र पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप सैदाने,इंटकचे माजी अध्यक्ष रमाकांत शिंदे, हिंगोनेचे सरपंच सुनील सोनवणे, मेहरगाव सरपंच शरद पाटील, सावखेडा गावचे सरपंच पती आत्माराम अहिरे, एस.टी.कामगार संघटनेचे शाह कयुम, बहुजन रयत परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोरसे, सुरेश कांबळे, संजय मरसाळे, प्रा. जितेश संदानशिव, अविनाश बिर्हाडे, मिलिंद निकम, कमलाकर संदांशीव, राजू मोरे, किरण मोहिते, आतिष बिर्हाडे, विजय वाडेकर, विजय गाढे, अनेक सह्यांचे निवेदन देण्यात आले.

आम्हाला फॉलो करा
1 Comment
  1. विजय गाढे says

    EVM हटाओ , संविधान बचाओ ।

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!