मोहाडी येथे आगीत दोन घरे खाक

0
शेअर करा !

जळगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मोहाडी येथे रविवारी दुपारी अकस्मात आग लागून दोन घरे खाक झाल्याची घटना घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीत घरातील गरजेच्या वस्तूंसह ३० हजार रुपयांची रोख रक्कमही जाळून खाक झाली.

अधिक माहिती अशी की, मोहाडी येथे जगन बाविस्कर आणि गोरख सोनावणे हे सासरे – जावाई लाकडी पार्टिशनच्या घरात शेजारी – शेजारी राहतात, दोन्ही कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असता अचानक आग लागून दोन्ही घरे खाक झाली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोरख सोनावणे यांनी नुकतीच म्हैस विकल्याने आलेले ३० हजार रुपये ही या आगीत इतर सामानासह खाक झाल्याचे वृत्त आहे. जळगाव महापालिकेच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणली.

आम्हाला फॉलो करा

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!