चाळीसगावात राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन

रयत सेनेच्या वतीने जिजाऊंची जयंती साजरी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील जगदंबा ऑटो पार्टस येथे रयत सेनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज मान्यवरांच्या हस्ते जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दरवर्षी राजमाता जिजाऊ यांची जयंती १२ जानेवारी रोजी देशभरात साजरी करण्यात येते. आपले आदर्श संस्कार घडवून सामान्य रयतेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा आणि विश्वास छत्रपती शिवाजी महाराज यांना देणाऱ्या राजमाता जिजाऊ संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्फूर्तीदायी आहेत. माता जिजाऊंचे धैर्य प्रत्येक स्त्रीने आत्मसात करून खंबीरपणे स्वबळावर उभे राहता यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी राजमाता जिजाऊंनी या भूमीला दोन छत्रपती दिले. आणि अन्याय अत्याचारांचा समुळ नायनाट करून स्वराज्यात स्त्रीला जगण्याचा मुक्तपणे अधिकार दिला. मात्र या कलयुगात महिला व तरुणीवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. त्यामुळे महिलांनी स्वत खंबीर होऊन अन्याया विरोधात प्रतिकार करून स्वतःची संरक्षण केली पाहिजे असे प्रतिपादन रयत सेनेचे पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी रयतसेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, विलास मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, आर्कि भामरे, आर. बी. जगताप, प्रा. शामकांत निकम, आबा देवरे, अनिकेत पगारे,चौधरी आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content