Home Cities जळगाव फैजपुरचा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

फैजपुरचा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


download 2
 

जळगाव (प्रतिनिधी) फैजपुर शहराचा 9 ऑक्टोबर, 2019 रोजी भरणारा आठवडे बाजार पुढील दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डाॅ अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

 

आठवडे बाजाराच्या दिवशी फैजपूर शहरातील देवी विसर्जन होणार आहे. देवी विसर्जनाचा मार्ग हा आठवडे बाजार भरत असलेल्या भागातून जात असल्याने या भागात लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने 9 ऑक्टोबर, 2019 रोजीचा आठवडे बाजार हा बंद ठेवुन पुढील दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.


Protected Content

Play sound