महापालिकेची महासभा कोरम अभावी तहकूब !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आयुक्ताच्या मानमानी कारभाराला कंटाळून सर्व पक्षिय नगरसेवकांच्या मागणीवरून महासभेचे आयेाजन महापौर जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. परंतू बहुतांशी नगरसेवक या महासभेला अनुपस्थित राहिल्याने कोरम अभावी महासभा महापौर यांनी तहकुब केली. महासभेचे आयोजन केवळ फार्स ठरली आहे. नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात नाराजी नाट्यमय सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड ह्या विकास कामांसाठी नगरसेवकांना सहकार्य करीत नसल्याचा आरोप करत माजी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांच्यासह इतर नगरसेवकांनी आयुक्तांच्या बदलीसाठी उपोषण सुरू केले होते. त्यात काही सत्ताधारी नगरसेवकही सहभागी झाल्याचे दिसून आले. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पारित करण्यासाठी नगरसेवकांच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. त्यासाठी महापालिकेत महासभेचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव पारित करणे हा भाजपा पक्षाच्या दृष्टिने अडचणीचा विषय होवू शकत असल्याचे पाहून मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी तातडीने नगरसेवकांसह आयुक्त यांची बैठक बोलावून समझोता करण्यात आला. त्यामुळे अविश्वासाचा ठराव मागे घेतला जाईल असे मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना जाहीर केले.

दरम्यान, मंगळवारी १ ऑगस्ट रोजी जळगाव महापालिकेच्या आयोजित महासभेत प्रस्ताव बारगळणार असल्याचे ७५ पैकी ७० नगरसेवकांनी महासभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे महासभेचा कोरम पुर्ण न झाल्याने आजची महासभा तहकूब करण्यात आली आहे. यामुळे आयुक्तांवर अविश्वासाचा ठराव पारित होवू शकला नाही. आजच महासभा केवळ फार्स असल्याचे दिसून आले.

Protected Content